Wednesday 4 May 2011

AIEEE EXAM

विद्यार्थी ताटकळले, पालकांनाही अरेरावी!
नाशिकला ‘एआयईईई’चा दोनदा पेपर
राजूर, २ मे/वार्ताहर
‘एआयईईई’च्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना फटका बसला असतानाच नाशिक येथे सपकाळ नॉलेज हबवरील अभियांत्रिकी महाविद्यालयात मात्र विद्यार्थ्यांना दोन वेळा पेपर द्यावा लागला. या बाबत विचारणा करणाऱ्या पालकांना कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे रवींद्र गंभीरराव सपकाळ यांनी उर्मट भाषा वापरली. त्यामुळे पालकांचा संताप अनावर होऊन एकच गोंधळ उडाला.
या गदारोळात विद्यार्थ्यांना एका पेपरसाठी ८ तास एकाच जागी बसून राहावे लागले. तसेच पालकांनाही ताटकळावे लागले. दुपारी ४ वाजता पेपर देऊन मुले बाहेर आली, ती चेहऱ्यावर उद्वेगाचे भाव ठेवूनच. परीक्षेतील हा गलथानपणा थांबावा, अशी विनंती त्रस्त विद्यार्थी व पालकांनी केली. या बाबत शिक्षण खात्याला निवेदन पाठविण्यात येणार आहे.
पालकांचे प्रतिनिधी एस. पी. पाटील, एस. एन. जगदाळे, विलास शेवाळे, महेंद्र नवले, प्रकाश देसले, प्रा. एस. जी. पुराने, पुराणिक, हांडे, सुरेश भवारी यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व निषेध केला.
एइआयईईई या परीक्षेसाठी नगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोपरगाव, संगमनेर येथील विद्यार्थी आर्चीड इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले होते. ऑल इंडिया इंजिनिअरिंग एन्ट्रान्स एक्झामचा पेपर उत्तरप्रदेशमध्ये फुटल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा काही तासांनी पुढे ढकलण्यात आली. वृत्तवाहिन्यांवरही हे वृत्त प्रसारित झाले. नाशिक येथील या स्कूलमध्ये मात्र बरोबर सकाळी साडेनऊ वाजता पेपर सुरू झाला. साडेदहापर्यंत बाहेर उभे असलेले पालक संभ्रमात पडले. वेळ बदलूनही मुले आत पेपर देत असल्याचे पाहून पालकांनी संबंधितांची भेट घेतली. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्हाला निरोप आला नाही. आत दिल्लीचे साहेब आहेत. ते निर्णय घेतील, असे सांगून पालकांची बोळवण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, सर्वच केंद्रांवरील परीक्षांची वेळ दुपारी १२ ते ३ ठेवल्याचे जाहीर होऊनही येथे विद्यार्थी पेपर लिहीत होते.
पालकांनी गेटवर एकच गोंधळ केला. त्यामुळे कल्याणी ट्रस्टचे विश्वस्त सपकाळ पालकांसमोर आले. प्रा. पुराने यांनी ‘विद्यार्थ्यांना ९ ते १२ व १२ ते ३’ असे दोन पेपर द्यायचे आहेत. इतर ठिकाणी परीक्षांची वेळ बदलली. मात्र, आमची मुले अजूनही पेपर लिहितात. तुम्ही को-ऑर्डीनेटरची भूमिका घ्या, असे सुचविले. त्यावर सपकाळ यांनी उद्दामपणाने ‘मी सक्षम आहे. तुम्ही बाहेर थांबा’ असे म्हटले. त्यामुळे पालक संतप्त झाले. दिल्लीच्या साहेबांना बोलवा असे पालक म्हणताच सपकाळ यांनी ‘मी रिकामचोट आहे काय’ अशी भाषा वापरली. अखेर सुरक्षा कर्मचारी व पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले यांनी पालकांना शांत केले. त्याच वेळी प्राचार्यानी १२ ते ३ अशी परीक्षेची वेळ जाहीर करून विद्यार्थ्यांना जेवण देण्याची जबाबदारी घेतली.

1 comment: