Tuesday 10 May 2011

उन्हाळ्यात ग्रामीण भागात दिसणारे चित्र फारसे उत्साहवर्धक नसते. गावात एखाद्या घरी विवाह सोहळा असला की, तेवढय़ापुरती जाणवणारी लगबग, उत्साह त्यानंतर मात्र दिसत नाही. गावातील पारांवर गप्पांचे व पत्त्यांचे अड्डे रंगलेले दिसतात. दुपारच्या वेळी बहुतेकांनी या पारावरच ताणून दिलेली असते. कामाअभावी किंवा काम असूनही त्याविषयी योग्य प्रकारे जनजागृती न झाल्याने गावागावांमध्ये अशी श्रमशक्ती वाया जात असल्याचे दिसते. आळसावलेल्या पारांचे हे दृश्य बदलण्याची कुवत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत नक्कीच आहे. या मोहिमेतील विविध तरतुदींची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यास उन्हाळ्यात दिसणारे आळसावलेल्या पारांचे दृश्य उत्साहवर्धक दिसू शकेल. उन्हाळ्यात उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी पारा ४० अंशाच्या वरच असतो. त्यामुळे दुपारच्या वेळेला श्रमयुक्त काम करणे कठीण असते. अशा वेळी आराम करण्यासाठी मग पाराची निवड केली जाते. निव्वळ वेळ वाया घालवण्यापेक्षा या वेळेचा सदुपयोग तंटामुक्त योजनेची माहिती देण्यासाठी करून घेता येऊ शकतो. जनजागृतीपर व्याख्यान, किंवा स्लाईड शोद्वारे तंटामुक्त योजनेचे फायदे ग्रामस्थांना पटवून देता येऊ शकतात. किंवा कीर्तन, प्रवचनाद्वारेही ग्रामसुधाराच्या दिशेने पाऊल टाकता येते. याशिवाय ज्या ज्या गावांनी या तंटामुक्त योजनेद्वारे प्रगती साधली आहे, अशा गावातील मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या अनुभवाचे बोल ग्रामस्थांना ऐकता येतील. गावातील अनिष्ट प्रथांविषयी विचारविनिमय करण्यात येऊन त्या कशा प्रकारे बंद करता येऊ शकतील, यावर मंथन होऊ शकेल. दुपारच्या वेळी कोणती हलकी कामे करता येण्यासारखी आहेत, ती करता येऊ शकतील. असे केले तरी आळसावलेल्या पारांचे चित्र बदललेले दिसेल.        (क्रमश:

1 comment: